पालकमंत्र्यांनी केली सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल व निर्माणाधिन कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:34+5:302021-01-08T04:56:34+5:30
यावेळी विधान परिषदेचे आमदार रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, निवासी ...

पालकमंत्र्यांनी केली सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल व निर्माणाधिन कामांची पाहणी
यावेळी विधान परिषदेचे आमदार रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए. ए. गणोरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटला भेट देऊन हॉस्पिटलचे बांधकाम व वैद्यकीय यंत्रसामुग्रीचे पाहणी केली. इमारतीचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा व उपचाराकरिता आवश्यक यंत्राची स्थापना करून सामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्ह्यातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना उपाचाऱ्याकरिता सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलचा मोठया प्रमाणात लाभ होणार असून, दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोईचे होणार आहे.
पोलीस वसाहत व पोलीस आयुक्तालयाचे निर्माणाधिन बांधकामाची पाहणी करुन पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच सामाजिक न्याय भवनाचे कामाची पाहणी करून विहित मुदतीच्या आत व दर्जेदार भवनाचे निर्माण कार्य पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत, तर जिल्ह्यातील सांस्कृतिक भवनाचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे,असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.