भूजलपातळीत घट; संत्रा, लिंबू बागा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:33 IST2019-04-12T13:33:32+5:302019-04-12T13:33:40+5:30
अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

भूजलपातळीत घट; संत्रा, लिंबू बागा धोक्यात
अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. भूगर्भपातळीत प्रचंड घट झाल्याने बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने संत्रा, लिंबू फळबागा वाळण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत.
विदर्भात १ लाख २५ हजार हेक्टरवर संत्रा असून, २५ ते ३० हजार हेक्टरवर लिंबू आहे. कागदी लिंबू क्षेत्र अकोला जिल्ह्यत सर्वात जास्त आहे; परंतु मागील काही वर्षांपासून पावसाची सरासरी घटली असून, गत दोन वर्षांपासून तर सरासरीच्या अर्धाही पाऊस होत असल्याने भूगर्भात पाणी साठण्याचे प्रमाण कमी झाले आहे. धरण, सिंचन प्रकल्पही भरले नाही. भूगर्भातील पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला पिके घेणे कठीण झाले. यावर्षी त्यात भर पडली. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती विदारक असून, या जिल्ह्यात यावर्षी सरासरी १ मीटरने भूगर्भसाठा कमी झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या जिल्ह्यात पाणीच उपलब्ध नसल्याने भाजीपाला पिके तर घेणे बंद आहे, आता फळ पिके वाचविताना शेतकरी हैराण झाला आहे. पाणीच नसल्याने फळ झाडे वाळण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. तेच चित्र अकोला जिल्ह्याचे असून, जवळपास सर्व धरणांचा साठा कमी झाला आहे. भूगर्भपातळी घटल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना ही झाडे वाचविताना बरेच कष्ट घ्यावे लागत आहे; पण पाणीच उपलब्ध नसल्याने काही बागा वाळण्याच्या स्थितीत पोहोेचल्या आहेत.
वाशिम, अमरावतीचे चित्रही भीषण आहे. सिंचन प्रकल्पामध्ये जे पाणी आहे ते पिण्यासाठी आरक्षित असल्याने शेतकºयांवर फळबागा टिकविण्याचे संकट उभे ठाकले आहे. विशेष यावर्षी मार्च महिन्यापासून सूर्य आग ओकत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पारा ४४ पार झाला. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.
- उपाययोजना
शेतकºयांनी यावर्षी बहार न घेता ज्यांच्याकडे थोडी फार पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी ठिबक पद्धतीने झाडाच्या बुंध्याजवळ पाणी द्यावे. झाडाच्या बुंध्याजवळ, आळ््यात पालापाचोळ््याचे मल्चिंग आवरण टाकावे.