मुर्तीजापुरात किराणा दुकानास आग; लाखोंचा माल भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:14 IST2020-12-07T12:13:15+5:302020-12-07T12:14:51+5:30

Fire at Murtijapur भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

Grocery store in Murtijapur caught fire; Millions of goods were burnt | मुर्तीजापुरात किराणा दुकानास आग; लाखोंचा माल भस्मसात

मुर्तीजापुरात किराणा दुकानास आग; लाखोंचा माल भस्मसात

ठळक मुद्देइलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. अंदाजे १२ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक दलीप हिरालाल अरोरा यांनी दिली.

मुर्तीजापूर : स्थानिक बसस्थानक चौकातील एका किराणा दुकानास रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
           येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या मोहन किराणा दुकानाला ६ डिसेंबरच्या मध्यरात्री इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दुकानातील किराणा माल व इतर साहित्य आगीत खाक झाल्याने यात अंदाजे १२ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक दलीप हिरालाल अरोरा यांनी लोकमतशी बोलताना दिली. रात्री लागलेली आग नगर परिषद अग्निशमन दलाच्या मदतीने पहाटे आटोक्यात आली. सकाळी ११ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कार्य चालूच होते. इलेक्ट्रिक मिटर मध्ये बिघाड झाल्याने त्याने पेट घेतला यामुळे संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती आहे.

Web Title: Grocery store in Murtijapur caught fire; Millions of goods were burnt