किराणा, भाजीपाला सकाळी ११ नंतर बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:18+5:302021-04-21T04:19:18+5:30
अकाेला : अकाेल्यात कोरोनाचे संक्रमण अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे आणखी कडक पावले उचलण्यात ...

किराणा, भाजीपाला सकाळी ११ नंतर बंदच
अकाेला : अकाेल्यात कोरोनाचे संक्रमण अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे आणखी कडक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत मंगळवार रात्रीपासून आणखी कडक करण्यात आली आहे. औषधांची दुकाने सोडून अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, डेअरी, भाजीपाल्यासह चिकन, मटण, मासे विक्रीची व इतर वस्तूंची दुकानेही आता सकाळी ११ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. या मार्गदर्शक सूचना मंगळवार २० च्या रात्री आठ वाजेपासून अमलात येतील. निश्चित करण्यात आलेल्या वेळा या व्यक्ती तसेच संस्थांसाठी लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने याआधीच्या निर्बंधांबाबतच्या आदेशामधील अत्यावश्यक बाबीतील आस्थापना/ कार्यालये यांच्याकरिता वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचे काटेकाेर पालन करण्यात यावे. काेणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. रुग्णालये, कोविड हॉस्पिटल, आयसीयू, क्रिटिकल सेंटर इत्यादी अत्यावश्यक ठिकाणी सामग्री व तदनुषंगिक साहित्य केवळ उपलब्ध करून देण्यासाठी उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत संबंधित दुकानदार, विक्रेते यांना दुकान उघडून मालाची विक्री करता येणार नाही असेही आदेशात नमूद केले आहे.
काय सुरू राहील व त्याची वेळ
१ किराणा दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
२ भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने (द्वार वितरण वगळता) सकाळी ७.०० ते ११.००
३ दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी )
(घरपोच दूधविक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील.) सकाळी ७.०० ते ११.०० सायंकाळी ५.०० ते ७.००
४ सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्रीफार्म, मासे आणि अंडींसह) सकाळी ७.०० ते ११.००
५ शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. सकाळी ७.०० ते ११.००
६ पाळीव प्राणी, खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
७ पावसाळी हंगाम सामग्री संबंधित दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
८ सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, सहकारी संस्था, पतसंस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँक व सर्व वित्तीय संस्था. ( अत्यंत महत्त्वाचे / तातडीचे व्यवहाराकरिता) सकाळी ९.०० ते १.००
०९ पेट्रोलपंप खासगी वाहनांकरिता विक्री सकाळी ७.०० ते ११.००
१० पेट्रोलपंप शासकीय/ मालवाहतूक, ॲम्ब्युलन्स वाहनांकरिता विक्री नियमित वेळेनुसार
वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
वृत्तपत्र, मीडियासंदर्भात सेवा
पेट्रोलपंप, गॅस एजन्सी
सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने)
बांधकाम (साईटवर लेबर उपलब्ध असल्यास)
कोरोना लसीकरण व चाचणी केंद्र
अत्यावश्यक सेवेतील उद्योग व कारखाने
वकील व सीए यांची कार्यालये.
...........