संत गाडगे महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:24 IST2021-02-26T04:24:58+5:302021-02-26T04:24:58+5:30

मूर्तिजापूर : शहरातील शाकांबरी प्रतिष्ठान कार्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नागरिकांच्या ...

Greetings to Saint Gadge Maharaj | संत गाडगे महाराज यांना अभिवादन

संत गाडगे महाराज यांना अभिवादन

मूर्तिजापूर : शहरातील शाकांबरी प्रतिष्ठान कार्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रारंभी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे प्रमुख सतीश अग्रवाल यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच संत गाडगे महाराज यांनी संपूर्ण जगाला स्वच्छता राखण्याचा मंत्र दिला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले. यावेळी सुरेश तायडे, बाळासाहेब देशमुख, अनवर खान, बबलू यादव, संतोष ठाकरे, दिगंबर भूगूल, दीपक रामटेके, रवी खांडेकर, अजय साहब, गजानन तायडे, मधुकर भटकर, विश्वासराव सरोदे, अंकित अग्रवाल, विशाल अग्रवाल आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Greetings to Saint Gadge Maharaj