छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:24+5:302021-04-05T04:17:24+5:30

-------------------------------------------------- राजनखेडच्या विद्यालयातून टीव्ही लंपास! सायखेड : बार्शिटाकळी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या राजनखेड येथील ज्ञानप्रकाश विद्यालयातील हॉलमधून १५ ...

Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

--------------------------------------------------

राजनखेडच्या विद्यालयातून टीव्ही लंपास!

सायखेड : बार्शिटाकळी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या राजनखेड येथील ज्ञानप्रकाश विद्यालयातील हॉलमधून १५ हजार रुपये किमतीचा टीव्ही संच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याने सेटटॉपबॉक्स व दोन रिमोट लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच ज्ञानप्रकाश विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक चिमाजी सदुजी पिसाळ यांच्या फिर्यादीवरून बार्शिटाकळी पोलिसांनी दि.३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------

अकोट-अकोला मार्गावर चारचाकीचा अपघात

अकोट : अकोट-अकोला मार्गाचे काम सुरू आहे; परंतु कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या मार्गाने ठिकठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देत असताना चक्क चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरले. रस्त्याच्या कडेला खड्डा नसल्याने या अपघातात सुदैवाने जीवित हानी घडली नाही. या मार्गाने सूचना फलके लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj