शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अकोल्यात 'सायन्स एक्सप्रेस'ला अभूतपूर्व प्रतिसाद

By ram.deshpande | Published: July 27, 2017 11:15 PM

अकोला, दि. 27 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांती 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा दोन दिवसांचा थांबा मिळाला. यातील पहिल्या दिवशी 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. 27 जुलै रोजी 28 हजार आठशे विद्यार्थ्यांनी 'सायन्स एक्सप्रेस'ला भेट दिली.जागतिक पर्यावरण बदलावर आधारित 16 वातानुकूलित डब्यातील ...

ठळक मुद्देपहिल्या दिवशी 30 हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

अकोला, दि. 27 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांती 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा दोन दिवसांचा थांबा मिळाला. यातील पहिल्या दिवशी 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. 27 जुलै रोजी 28 हजार आठशे विद्यार्थ्यांनी 'सायन्स एक्सप्रेस'ला भेट दिली.

जागतिक पर्यावरण बदलावर आधारित 16 वातानुकूलित डब्यातील वैज्ञानिक प्रदर्शन पाहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर थांबलेल्या 'सायन्स एक्सप्रेस'चे सकाळी 10 वाजता औपचारिक उदघाटन झाले. यावेळी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, मध्य रेल्वे डीआरयुसीसी सदस्य बसंतकुमार बाछुका, रेल्वेस्थनाक प्रबंधक जी.पी.मिणा, उद्भव सांगळे यांच्यासह विभागीय आणि स्थानिक रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

भेट देणाऱ्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचा समावेश होता. यानिमित्त रेल्वेस्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेल्वेस्थानकावर येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अकोला भाजप च्यावतीने परिसरात विशेष बूथ उघडण्यात आले होते. तर अकोला रोटरी क्लबच्या वतीने तहानलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अकोलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल 'सायन्स एक्सप्रेस'चे मुख व्यवस्थापक नितीन तिवाने यांनी 'लोकमत'कडे समाधान व्यक्त केले. 28 जुलै रोजी देखील सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे प्रदेर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.