महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 10:33 IST2021-05-26T10:33:27+5:302021-05-26T10:33:42+5:30

MSEDCL News : उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे.

Grant leave sanctioned to MSEDCL corona hit employees | महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर

महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर

अकोला : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक साहाय्यता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत.

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रिम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रिम मंजूर करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य तसेच विम्याचे २० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्य स्त्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.

Web Title: Grant leave sanctioned to MSEDCL corona hit employees