शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान दिले अमरावती जिल्ह्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 1:38 PM

आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.

अकोला: ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान विभागीय कृषी सहसंचालकांनी परस्पर अमरावती जिल्ह्याला दिले. हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासकीय अधिकाºयांचा अन्याय आहे. याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.‘मागेल त्याला शेततळे’ ही भाजपा शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून ७९ लाख रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार शासनाने नुकतेच ३१.५० लाख रुपये अनुदान दिले. तथापि, यातील १५ लाख रुपये अनुदान विभागीय कृषी सहसंचालक यांनी बेकायदेशीरपणे अमरावती जिल्ह्याकडे वळते केले. कृषी आयुक्तालयाने एकमेव अकोला जिल्ह्यासाठी ३१.५० लाख रुपये अनुदान वितरित केले. हे अनुदान वळते करण्याचा कोणताही अधिकार नसताना विभागीय कृषी सहसंचालकांनी एका पत्राद्वारे १५ लाख रुपये अनुदान देण्याचा आदेश जिल्हा कृषी अधीक्षक अकोला यांना दिले.जिल्ह्यातील शेतकºयांवर झालेला अन्यायासंदर्भात आ. सावरकर यांनी विभागीय कृषी संचालक अमरावती सुभाष नागरे यांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. सध्या पेरणी, दुष्काळ, दुबार पेरणी अशा संकटात शेतकरी सापडला असताना त्याला पैशाची गरज आहे. कृषी विभागालाही शेतकºयांची ही अवस्था माहीत असताना कृषी विभागाच्या अधिकाºयांची अविवेकी वागणूक समाज व शासनाससुद्धा घातक ठरणारी आहे. त्यामुळे अशा अधिकाºयावर कर्तव्यपालन, शिस्त लावण्यासोबतच कारवाई करावी, असेही आ. रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.पूर्वी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असा प्रांतिक वाद राजकीय व्यासपीठावर असायचा. आता मात्र जिल्ह्या-जिल्ह्यात वाद निर्माण करण्याचा विडा शासकीय अधिकाºयांनी उचलला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, अशा निर्णयामुळे जनतेची शासनाप्रती नाराजी निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रकाराकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांवर होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, तसेच शासकीय अधिकाºयांकडून होणारे जनतेवरील अन्याय आणि भाजप शासनाप्रती असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असलेल्या अधिकाºयांनी सामाजिक दायित्वावा विसर पडू न देता स्वयंशिस्त अंगीकारावी, असे आवाहन आ. रणधीर सावरकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीRandhir Savarkarरणधीर सावरकर