शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:03 IST

अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे.

 - राजेश शेगोकारअकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे. यामध्ये अकोल्याची एकमेव जागा भारिप-बमसंसाठी तर बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या सहा जागांच्या दाव्यालाही वाटण्याच्या अक्षता लावल्याची माहिती आहे. जागा वाटपासंदर्भातील चर्चा सध्या पश्चिम वºहाडच्या राजकारणात रंगत असल्याने जागा वाटपाच्या मुद्यावरच महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, डावे पक्ष यांचा समावेश आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही आघाडीत समावेश व्हावा, यासाठी दोन्ही काँग्रेसने जाहीरपणे अनुकूलता दाखविली आहे; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत केलेल्या संगतीमुळे त्यांचा महाआघाडीतील प्रवेशाचा मार्ग थांबल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीचे जागा वाटप ठरविले असून, त्यामध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडल्या जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अ‍ॅड. आंबेडकरांनी आधीच १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे अवघ्या एका जागेसाठी ते महाआघाडीसोबत जातील, ही शक्यताच मावळली आहे. दुसरीकडे महाआघाडीत प्रवेशासाठी ‘एमआयएम’ला सोडण्याची काँग्रेसची अट त्यांना मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे, त्यामुळे तसेही त्यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्टच झाले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागा मागितल्या असल्या, तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत ते आग्रही आहेत. अशा स्थितीत स्वाभिमानीला राजू शेट्टींसाठी हातकणंगले हा एकच मतदारसंघ सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीने दाखविलेली तयारी स्वाभिमानीला मान्य होणार नाही. त्यामुळे हे संभाव्य जागा वाटप महाआघाडीत बिघाडीचे आतापासूनच बीजारोपण करीत असल्याचे दिसत आहे.‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे लक्षस्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे चार मतदारसंघ मागितले आहेत, त्यामध्ये विदर्भातील बुलडाणा व वर्धा हे दोन मतदारसंघ आहेत. राजू शेट्टी गेल्यावेळी महायुतीमध्ये सहभागी असताना त्यांना त्यांच्या मतदारसंघासोबतच माढा हा मतदारसंघ दिला होता. तेच सूत्र महाआघाडीत कायम राहिले, तर त्यांना आणखी एक मतदारसंघ कदाचित मिळेल, त्यामुळे वर्ध्यासाठी माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यासाठी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यापैकी कोणासाठी ते आग्रही राहतील, यावरच या मोहिते व तुपकरांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना