ग्राम पंचायती झाल्या ऑनलाईन
By Admin | Updated: August 21, 2014 22:58 IST2014-08-21T22:58:38+5:302014-08-21T22:58:38+5:30
संग्राम प्रोजेक्टच्या विविध योजना व सेवेबाबत नागरिकात जागृती निर्माण व्हावी याकरिता तालुक्यातील ग्रामपंचायती व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्यात आल्या.

ग्राम पंचायती झाल्या ऑनलाईन
मानोरा: केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेल्या मिशन मोड प्रोजेक्ट ई-पंचायत अंतर्गत संग्राम प्रोजेक्टच्या विविध योजना व सेवेबाबत नागरिकात जागृती निर्माण व्हावी याकरिता तालुक्यातील ग्रामपंचायती व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्यात आल्या. त्यावरून सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांनी सरपंच व नागरिकासोबत संवाद साधला जाणार आहे. मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून तालुक्यातील मानोरा, इंझोरी, तोरनाळा, आमदर, शेंदुरजना अढाव, सोमठाणा, कोंडोली आदी ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सभापती धनश्री अभय राठोड, उपसभापती अभिजीत पाटील, पं.स.सदस्य समाधान वाघमारे, गटविकास अधिकारी कांबळे, विस्तार अधिकारी नायसे, अवगण यांनी संग्रामच्या विविध सेवा व सुविधाबाबत चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संग्राम तालुका समन्वयक रवींद्र खिराडे, रंजीत राऊत, पुंडलिक राठोड, श्रीकांत ढाकुलकर, निलेश देशमुख व संगणक ऑपरेटरांनी सहकार्य केले.