शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

‘तो’ धान्याचा ट्रक पोलिसांनी सोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:11 IST

अकोट : अकोट शहर पोलिसांनी रेशनचा तांदूळ अवैधरीत्या नेल्या जात असल्याच्या संशयावरून ३१ ऑगस्ट रोजी ९८ कट्टे असलेला एक मिनीट्रक पकडला; परंतु महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायामध्ये वाहनातील रेशनचा माल हा शासकीय धान्य गोदामातून मोजमाप करून नियोजित गावांकरिता वितरित करण्यात आला, असा अहवाल दिल्याने अखेर पकडलेला तो ट्रक कोणतीही कारवाई न करता २ सप्टेंबर रोजी सोडून देण्याची वेळ अकोट शहर पोलिसांवर ओढवली. 

ठळक मुद्देअकोट महसूल विभागाने केले हात वरचौकशी पथक नेमले 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट शहर पोलिसांनी रेशनचा तांदूळ अवैधरीत्या नेल्या जात असल्याच्या संशयावरून ३१ ऑगस्ट रोजी ९८ कट्टे असलेला एक मिनीट्रक पकडला; परंतु महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायामध्ये वाहनातील रेशनचा माल हा शासकीय धान्य गोदामातून मोजमाप करून नियोजित गावांकरिता वितरित करण्यात आला, असा अहवाल दिल्याने अखेर पकडलेला तो ट्रक कोणतीही कारवाई न करता २ सप्टेंबर रोजी सोडून देण्याची वेळ अकोट शहर पोलिसांवर ओढवली. अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ ऑगस्ट रोजी ९८ कट्टे तांदूळ असलेले  टाटा ४0७ क्र. एम एच २८ बी ९0४५  क्रमांकाचा मिनीट्रक उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशावरुन पकडण्यात आला. वाहनधारकाला विचारपूस केली असता, हा माल शासकीय गोदामातील असून, काटा करण्यास जात आहे व नंतर स्वस्त धान्य दुकान दनोरी, पणोरी, पळसोद येथे नेत असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी वाहनातून रेशनचा तांदूळ अवैधरीत्या नेल्या जात असल्याच्या संशयावरून तहसील कार्यालयाकडून अभिप्राय मागविला. त्यानुसार अकोटचे तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी पोलीस स्टेशनच्या पत्राचा संदर्भ देत गोदाम लिपिक ए.व्ही. जाधव यांना खुलासा मागविला. हा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशनला दिलेल्या अभिप्रायामध्ये माल हा दनोरी, पणोरी व पळसोद येथील स्वस्त धान्य दुकानाचा असून, दुकानदार के.एस. पोतले यांना वितरित करण्यात आला. हा माल ३१ ऑगस्टच्या सायंकाळी ६ वाजता  देण्यात आला. तसेच वितरित केलेले तांदळाचे कट्टे प्रमाणित असल्यामुळे वजन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सूचना दुकानदारांना दिली नाही. वाहन वजनकाटा करण्याकरिता पाठविण्याची कारवाई गोदामपाल यांनी केली नसल्याचे तहसीलदार यांनी पोलीस निरीक्षक अकोट शहर यांना कळविले. 

चौकशी पथक नेमले शासकीय धान्य गोदामातील तसेच वितरित केलेल्या मालाची चौकशी करण्याकरिता  जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी चौकशी पथक नेमले आहे. त्यामध्ये सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी औदुंबर पाटील यांच्यासह जिल्हा पुरवठा कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक,  लेखापाल आदी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या पथकाने शासकीय धान्य गोदामात स्वस्त धान्य दुकानदारांना चौकशीसाठी बोलाविले होते; परंतु पुढे काय कार्यवाही झाली, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. 

३५ दुकानदार रडारवर! शासकीय धान्य गोदामामधून तालुक्यातील ३५ स्वस्त धान्य दुकानदारांना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास धान्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजीच पोतले या स्वस्त धान्य दुकानदाराचे वाहन ताब्यात घेतले होते. त्यामुळे तालुक्यातील त्या ३५ गावांतील धान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानात पोहचले की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली असून, दुकानदारांच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी कारवाई टाळली! तहसील कार्यालयाने अभिप्राय दिल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी पकडलेल्या ट्रकप्रकरणी तहसील कार्यालयाने फौजदारी कारवाई टाळली. पोलिसांनी अवैधरीत्या रेशनच्या तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन सदर वाहन अकोट शहरातील मेनरोडवरून ताब्यात घेतले. यावेळी वाहनचालकाने  काटा करण्यास जात असल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु तहसील कार्यालयाने दिलेल्या अभिप्रायामध्ये तांदळाचे प्रमाणित कट्टे असल्यामुळे वजन करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदाराला दिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तहसील कार्यालयाच्या अभिप्रायाला ग्राह्य धरुन २ सप्टेंबर रोजी सदर वाहन सोडून देण्यात आले, तर महसूल विभागाने गोदामामधून निघालेला माल थेट स्वस्त धान्य दुकानात पोहचणे आवश्यक असताना ते इतरत्र कसे भरकटले, याची कसून चौकशी करणे गरजेचे होते; परंतु कारवाई करणार कोण, या पेचप्रसंगात हा ट्रक सुटल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

प्रमाणित बॅगमध्ये ५१ किलो धान्य आलेच कसे?विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गोदामपाल योगेश मेश्राम यांना धान्याच्या अपहारप्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचवेळी गोदामात येणार्‍या धान्याच्या बॅगचे वजन प्रमाणित करणे, प्रमाणित वजनाच्या बॅगचे वाटप करण्याची पद्धत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ठरवून दिली. जिल्हाधिकार्‍यांनी ठरवून दिल्यानंतरही गोदामपालाने बॅगमध्ये ५१ किलो धान्य कसे भरले, त्याचवेळी दुकानदारांना शंभरऐवजी ९८ बॅगचे वाटप का केले, या प्रश्नांची उत्तरे न घेताच तहसीलदार घुगे यांनी दुकानदारांना दिलेली क्लीन चिट वादात सापडण्याची चिन्हे आहेत.