व्यायाम शाळेच्या अनुदानात वाढ
By Admin | Updated: August 18, 2014 22:39 IST2014-08-18T22:09:58+5:302014-08-18T22:39:43+5:30
व्यायामशाळा विकासासाठी अनुदानात ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली

व्यायाम शाळेच्या अनुदानात वाढ
लोणार : राज्याच्या क्रीडा धोरणानुसार १९९७ पासून व्यायामशाळा विकासासाठी दिल्या जाणार्या २ लाख रुपयांच्या अनुदानात नविन धोरणानुसार ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच नवीन शासन निर्णयानुसार व्यायाम शाळा बांधकाम आणि व्यायाम साहित्य देण्याच्या जिल्हास्तरीय योजनेच्या अनुदानाची र्मयादा ७ लाख रुपयांपर्यत वाढविण्यात आली आहे.
व्यायामशाळा विकासयोजनेअंतर्गत पूर्वी शासनाच्यावतीने व्यायाम शाळा बांधकामासाठी आणि व्यायाम साहित्यासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. यामध्ये संस्थाचालकांकडून अनुदान उचलूनही व्यायाम शाळेचे बांधकाम होत नव्हते. बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्याच्या २0१२ च्या क्रीडा धोरणानुसार व्यायाम शाळा विकास अनुदान योजना आणि जिल्हास्तरीय क्रीडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा केली आहे. त्यामध्ये या योजनेची अनुदान र्मयादा २ लाखावरुन ७ लाख रुपयांपर्यंत देण्याचा निर्णय शनिवारला घेण्यात आला. यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पूर्वी अनुदान घेणार्या संस्थेकडून व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात येत होते. परंतु अनुदान उचलूनही बर्याच वेळा व्यायाम शाळेचे बांधकाम होत नसे. त्यामुळे आता नवीन नियमानुसार वाढीव अनुदान देण्यात येणार असल्यामुळे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे.