गोविंदांचा उत्साह शिगेला

By Admin | Updated: August 19, 2014 23:19 IST2014-08-19T22:39:11+5:302014-08-19T23:19:54+5:30

दहिहंडी उत्सव म्हणजे तरूणाईसाठी पर्वणीच. रोमांच आणि थरार क्षणाक्षणाला वाढवित नेणारा गोविंदाचा उत्साह.

Govind enthusiasm Shigella | गोविंदांचा उत्साह शिगेला

गोविंदांचा उत्साह शिगेला

चिखली : दहिहंडी उत्सव म्हणजे तरूणाईसाठी पर्वणीच. रोमांच आणि थरार क्षणाक्षणाला वाढवित नेणारा गोविंदाचा उत्साह. याहीवर्षी चिखलीतील मानाची दहिहंडी असलेल्या छत्रपती शिवराय प्रतिष्ठाणचे दहिहंडी उत्सवात दिसून आला. उत्साहाला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहु छत्रपती यांचे वशंज संभाजी राजे भोसले (कोल्हापूर) यांची उपस्थिती गोविंदा बरोबरच प्रेक्षकांचाही उत्साह व्दिगुणीत करणारी ठरली. आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, माजी आमदार बाबुराव पाटील, नगराध्यक्षा सौ. शोभाताई सवडतकर, कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या उपस्थितीत या मानाच्या दहिहंडीचे विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी हिरकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा सौ.वृषालीताई बोंद्रे, उपविभागीय पोलीस अधिक्षक समिर शेख, ठाणेदार राजपुत, छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष साहेबराव डुकरे, उपाध्यक्ष सचिन शिंगणे, नगसेविका सौ. उषाताई डुकरे, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, बंजारा सेलचे माणिकराव जाधव, दिपक देशमाने, सुनिलकुमार सुरडकर, दिपक लहाने, प.स.सदस्य प्रसाद देशमुख, किशोर साखरे, दयाराम खरात, भारत खासभागे, हाजी रफिक, डॉ. इसरार, युवक कॉग्रेसचे राम डहाके, रमेश सुरडकर, तुषार भावसार, स्वाभिमानचे तुषार बोंद्रे, बिदुसिंग इंगळे, विजय वाघमारे, राहुल सवडतकर यांची उपस्थिती होती. यावर्षीच्या दहिहंडी सोहळयात ग्रामीण व शहरी १८ चुमींनी भाग घेतला पैकी पाच चमुनी पाच थर रचून दहिहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. सांयकाळी ४ वाजेपासून सुरू झालेला हा सोहळा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता. वेळ संपल्यामुळे या स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अँड. विलास नन्हई व श्याम वाकदकर यांनी केले.

Web Title: Govind enthusiasm Shigella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.