शेतकरी सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील - सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 01:55 IST2017-05-30T01:55:05+5:302017-05-30T01:55:05+5:30

अकोला पूर्व मतदारसंघात ४८ ठिकाणी घेतली शिवार संवाद फेरी

Government will try for empowerment of farmers - Savarkar | शेतकरी सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील - सावरकर

शेतकरी सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील - सावरकर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकरी सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, सर्वांचा विकास करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मतदारांनी दिलेली जबाबदारीचा लेखाजोखा देण्यासाठी शिवार संवाद सभा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन आ. रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला पूर्व मतदारसंघात ४८ ठिकाणी शिवार संवाद सभा होऊन २७ हजार ४३२ शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यात आला. भाजपा प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी, खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, तालुका अध्यक्ष अनिल गावंडे, मंगेश लोणकर, पुरुषोत्तम चौखंडे, मीनाक्षी गावंडे, निकिता रेड्डी, रुपली गोपनारायण, हेमलाता लोड, नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका रश्मी अवचार, पल्लवी मोरे, झोन सभापती मिलिंद राऊत, नगरसेविका सुनीता अग्रवाल, नगरसेवक सुभाष खंडारे, सुलभा ठाकूर, नगर सेवक अनिल मुरुमकर पं.स. सदस्य मीना गवळी, नगरसेवक विशाल इंगळे, नगर सेविका सुजाता अहिर, शारदा गावंडे, रेणुका उमाळे, न.प. सदस्य लता साबळे, न.प. सदस्य गजानन लोणकर, न.प. सदस्य सारिका जस्वानी, संगीता बोरोडे, पं.स. सदस्य अर्जुनसिंग सोळंके, मधुकर पाटकर, कल्पना घावट, योगेश पुराडउपाध्ये, रवी गावंडे, विवेक भरणे, विठ्ठल चतरकर, अण्णा उमाळे, दिनकरराव गावंडे, दिगंबर पाटील गावंडे, जयंत मसने आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय योगदान देऊन शिवार संवाद सभेच्या माध्यमातून बळीराजाशी संवाद साधला.
आ. रणधीर सावरकर यांनी १८ गावांत शिवार संवाद सभा घेऊन शेतकऱ्यांशी सरकारविषयी अपेक्षा योजना तसेच अडी-अडचणी व सरकारच्या भविष्यातील अनेक योजनांविषयी चर्चा केली. शेतकऱ्यांनी भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षात शिवार संवाद सभेमध्ये सक्रिय भाग घेऊन सरकारच्या योजनांची माहिती घेतली. तसेच सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त करून सरकारच्या अडी-अडचणी समजून घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: Government will try for empowerment of farmers - Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.