शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

शासकीय कापूस खरेदी यंदा आॅक्टोबरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 1:50 PM

आॅक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कापसाचे वाढलेले क्षेत्र व उत्पादनाची शक्यता बघता, यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने वर्तविली आहे; परंतु यावर्षी उत्पादन पंधरा दिवस उशिरा येण्याची शक्यता महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादन पणन महासंघाच्या सूत्राने वर्तविली असून,पणन महासंघ नोव्हेबंर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करणार आहे.राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टरवर कपाशी पिकाची पेरणी झालेली आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यात कापसावर परिणाम झाला आहे. असे असले तरी विदर्भात कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीला पावसाला विलंब झाल्याने पेरण्यांनाही तीन आठवडे विलंब झाला. पेरणीनंतरही तीन आठवडे पावसाचा खंड पडला; परंतु नंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने कपाशीचे पीक बहरले. तथापि, पुन्हा एक महिन्यापासून तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू आहे. सध्या कपाशीची स्थिती उत्तम आहे. उत्पादनही चांगले येण्याची शक्यता आहे. हे उत्पादन आॅक्टोबरऐवजी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु त्यासाठी आता पाऊस थांबणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास चांगले आलेले उत्पादन हातचे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने ‘सीसीआय’ने आॅक्टोबरच्या पंधरवड्यात कापूस खरेदीचे नियोजन केले आहे. पणन महासंघ ‘सीसीआय’चा उपअभिकर्ता आहे. त्यामुळे सीसीआयने आॅक्टोबरमध्ये खरेदी केंद्र सुरू केल्यास पणन महासंघ नोव्हेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात सुरू करणार असल्याचे पणन महासंघाच्या सूत्राने सांगितले.दरम्यान, यावर्षी चार प्रकारचे कापसाचे हमीदर जाहीर करण्यात आले असून, कापसाची प्रत व धाग्याच्या लांबीनुसार हे दर मिळणार आहेत. प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये, ५,४५०, ५,५०० ते ५,५५० रुपये दर ठरले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी