साठेबाजांना शासनाचा दणका

By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:19:42+5:302014-08-25T02:23:23+5:30

तीन वर्षांत राज्यात साठेबाजांच्या गोदामावरील छाप्यामधून दोन अब्ज, ६८ कोटी ४१ लाख रुपयांचा माल जप्त.

Government bunch of stockholders | साठेबाजांना शासनाचा दणका

साठेबाजांना शासनाचा दणका

खामगाव : स्वस्त धान्य दुकानातून वितरित केल्या जाणार्‍या विविध वस्तुंचा काळा बाजार तसेच नफेखोरीसाठी धान्याचा साठा करणार्‍या साठेबाजांविरूद्ध अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत राज्यात गेल्या तीन वर्षात सहा हजार १४0 धाडी टाकण्यात आल्या असून आठ हजार ६२0 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केल्या जाणार्‍या धान्याचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार प्रतिबंधक व सुरळीत कायदा देशातील सर्वच राज्यात अंमलात आणला आहे. या कायद्याअंतर्गत काळाबाजार करणार्‍या विरोधात धडक कारवाई केल्या जात आहे.
याशिवाय शेतकर्‍यांकडून कमी किंमतीत धान्य खरेदी केल्यानंतर नफ्यासाठी या धान्याची साठवणूक करणार्‍या साठेबाजांवरही शासनाने लक्ष्य केंद्रीत केले आहे.
राज्यात सन २0१0-११,२0११-१२ आणि २0१२-१३ या आर्थिक वर्षांत सहा हजार १४0 धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये तांदूळ, गहू, दाळी, बियाणे, केरोसीन, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, ऑईल, दूध, केमिकल, फर्टिलायझर, साखर आदी जीवनावश्यक वस्तूचा दोन अब्ज, ६८ कोटी ४0 लक्ष ९१ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले असून साठे बाजीवर नियत्रंण मिळविणे शक्य झाले आहे.


तीन वर्षांत टाकण्यात आलेल्या धाडी
वर्ष                                           धाडी              अटक व्यक्ती              जप्त माल
मार्च २0१0- एप्रिल २0११            २८४0                      ३८७७               २४३८४४१४४
मार्च २0११- एप्रिल २0१२            १९२२                      २७५८                ३६८0९५७२८
मार्च २0१२- एप्रिल २0१३             १३७८                     १९८५               २0७२१५१७३३

Web Title: Government bunch of stockholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.