लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता युवा मोर्चांतर्गत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त १0 ते २५ डिसेंबरदरम्यान सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत युवा कार्यकर्त्यांनी विभागामध्ये युवकांचे मेळावे आयोजित करून, त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगा आणि शासनाने केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेशअण्णा टिळेकर यांनी येथे केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गुरुवारी दुपारी आयोजित सुशासन संकल्प महोत्सवाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार संजय धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अरसड, प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, प्रदेश सरचिटणीस अँड. गिरीश गोखले, जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा, शहराध्यक्ष अनुप गोसावी, वाशिमचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष सोपान पन्हेरकर, शहराध्यक्ष विवेक कलोती, भाजपचे शहर सरचिटणीस डॉ. विनोद बोर्डे, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, जिल्हा सरचिटणीस राहुल वानखडे, लखन राजनकर आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त १0 ते २५ डिसेंबरदरम्यान भाजयुमोतर्फे सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करून, शासनाने साडेतीन वर्षांमध्ये जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. शासनाने केलेल्या विकास कामांची, राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येत आहे. त्यासाठी युवकांचे मेळावे आयोजित करण्यात यावे, असे आमदार योगेशअण्णा टिळेकर यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये खासदार संजय धोत्रे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सरचिटणीस दिलीप सांगळे यांनी केले. प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस व नगरसेवक अँड. गिरीश गोखले यांनी केले.
सुशासन संकल्पनेत शासनाची कामगिरी जनतेसमोर मांडा - योगेशअण्णा टिळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:31 IST
अकोला : भारतीय जनता युवा मोर्चांतर्गत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त १0 ते २५ डिसेंबरदरम्यान सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येत आहे.
सुशासन संकल्पनेत शासनाची कामगिरी जनतेसमोर मांडा - योगेशअण्णा टिळेकर
ठळक मुद्देभाजयुमो पदाधिकार्यांची पश्चिम विदर्भ विभागाची बैठक आमदार टिळेकर यांनी केले मार्गदर्शन