अकोला शहरातील ३० भागात जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा सुरु !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:50 IST2020-04-08T13:50:28+5:302020-04-08T13:50:48+5:30
अकोला शहरातील ३० भागांसह जिल्ह्यातील ३७ भागात घरपोच सेवा सुरु करण्यात आली आहे.

अकोला शहरातील ३० भागात जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा सुरु !
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ आणि जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचार बंदीकालावधीत किराणा,धान्य, भाजीपाला, फळं व जेवणाचे डबे इत्यादी जीनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सहकार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. बुधवारपर्यंत अकोला शहरातील ३० भागांसह जिल्ह्यातील ३७ भागात घरपोच सेवा सुरु करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन ’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना सहकारी संस्था व धर्मादाय संस्थामार्फत किराणा, धान्य, भाजीपाला, फळं व जेवणाचे डाबे इत्यादी जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा उपलब्ध करुनदेण्याचा उपक्रम जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) कार्यालयामार्फत सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये १ एप्रिलपर्यंतअकोला शहरातील विविध ३० भागांमध्ये तसेच कान्हेरी, कानशिवणी, शिवापूर, बोरगावमंजू, बार्शिटाकळी, हिवरखेड व तेल्हारा इत्यादी एकूण ३७ भागांत जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) डॉ.प्रवीण लोखंडे यांनी दिली.