गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला
By Atul.jaiswal | Updated: March 23, 2023 20:14 IST2023-03-23T20:11:03+5:302023-03-23T20:14:13+5:30
आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत.

गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला
अकोला : अमरावती-मुंबई-अमरावती एक्स्प्रेसमधील द्वितीय शयनयान श्रेणीचे पाच डबे कमी करण्याचा घाट घातल्यानंतर आता अकोलासह लगतच्या वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांना थेट राष्ट्रीय राजधानी दिल्लीला घेऊन जाणारी भुसावळ-हजरत निजामुद्दीन-भूसावळ (१२४०५/१२४०६) गोंडवाना सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्येही द्वितीय शयनयान श्रेणी (सेकंड स्लिपर क्लास)डब्ब्यावर कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत.
मुंबई-हावडा या महत्वाच्या लोहमार्गावर अकोला हे मध्य रेल्वेचे मोठे स्थानक आहे. या ठिकाणी देशाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये जाण्यासाठी गाड्या उपलब्ध असल्या तरी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी मोजक्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे भुसावळ-हजरत निजामुद्दीन-भूसावळ सुपरफास्ट एक्सप्रेस चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. उत्तर भारतातील शहरांमध्ये जाणारे अकोलेकर या गाडीला प्राधान्य देतात. या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सद्या सेकंड स्लिपर क्लासचे सहा डबे आहेत. या डब्यांची संख्या आता चारने कमी करून केवळ दोन डबे सामान्य प्रवाशांसाठी राखीव असणार आहेत. भूसावळ विभाग कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गोंडवाना सुपरफास्ट एक्स्प्रेसची कोच संरचना कायमस्वरुपी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या गाडीत आता प्रथम श्रेणी शयनयान श्रेणीचा एक डबा नव्याने जोडण्यात येणार आहे. थर्ड एसीच्या डब्यांची संख्या मात्र दहापर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच