शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गुडधीच्या पुनमची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

By admin | Updated: September 28, 2014 00:50 IST

पुनमची निवड दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.

अकोला: चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत गुडधीच्या पुनम रामनारायण कैथवास हिने १७ वर्षाआतील मुलींच्या गटात ५९ किलो वजनगटात विजेतेपद पटकाविले. पुनमची निवड दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.पुनम ही गोरेगाव खुर्द येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तर स्पर्धेचे आयोजन केले होते. पुनमने स्वर्णीम कामगिरी करीत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्‍चित केला. क्रीडा व युवक सेवा संचालयानालय महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक पंकजकुमार (भा.प्र.से.), नागपूर विभाग क्रीडा उपसंचालक विजय सतान, चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांच्या हस्ते स्पर्धास्थळी पुनमचा प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला. पुनमला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट, वडील रामनारायण कैथवास, काका राजकुमार कैथवास, आई किरण कैथवास आणि आजी पार्वताबाई कैथवास यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळेच यश प्राप्त करू शकली असल्याचे पुनमने प्राजंळपणे भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला पुनमकडून आशा असल्याचे तिचे प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांनी सांगितले.