शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

कुरीयरने आलेले ६0 लाखांचे सोने लुटले

By admin | Updated: March 3, 2015 23:39 IST

अकोल्यातील घटना, चाकुच्या धाकावर लुटले सोने.

अकोला: मुंबईहून अकोल्यात आलेले अडीच किलो सोन्याचे पार्सल सायकलवर घेऊन जाणार्‍या एका कुरियर कंपनीच्या नोकराला चाकूचा धाक दाखवून, ६0 लाखाचे सोने लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील भागवतवाडीसमोर घडली. अकोला शहरातील अनिकट भागात राहणारे प्रकाश जगन्नाथ खानेवाले(५५) हे प्रशांत शाह यांच्या कुरीयर सव्र्हीस कंपनीमध्ये काम करतात. मंगळवारी पहाटे विदर्भ एक्सप्रेसने अकोल्यातील पाच ते सहा सराफा व्यावसायिकांचे अडीच किलो सोने मुंबईहून येणार होते. हे सोने रेल्वेने मुंबईहून आणण्याची जबाबदारी दिनेश विश्‍वनाथ महल्ले यांची होती. त्यांच्याकडून सोने आणण्यासाठी प्रकाश खानेवाले पहाटे सायकलने रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांनी दिनेश महल्ले यांच्याकडून अडीच किलो सोन्याचे पार्सल घेतले आणि पिशवीमध्ये ठेऊन सायकलने ते प्रशांत शाह यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. रेल्वे स्टेशन रोडवरील भागवतवाडीजवळ आल्यानंतर, मागून विनाक्रमांकाच्या काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवर दोन युवक आले. त्यांनी तोंडाला कापड बांधले होते. त्यांनी खानेवाले यांना अडवून त्यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याजवळील सोन्याची पार्सलची पिशवी घेऊन ते पसार झाले. याप्रकारामूळे घाबरलेल्या खानेवाले यांनी या घटनेची माहिती मालकाला दिली. त्यानंतर दोघांनीही रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकाश खानेवाले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ३९२(३४) अन्वये गुन्हा दाखल केला. *आरोपींच्या शोधासाठी दोन पथकेसोने लूटल्याच्या या घटनेने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, इतर पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांनाही तपासकामी लावले. दोन पथकं जिल्हय़ात व जिल्हय़ाबाहेर पाठविण्यात आली. *आयजींना सलामीरामदासपेठ पोलीस ठाण्याचे वार्षीक निरीक्षण असल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे अकोल्याच्या दौर्‍यावर आले आहेत. अकोला दौर्‍यावर पहिल्यांदाच आलेल्या आयजींना चोरांनी ६0 लाखांचे सोने लूटून सलामी दिली.