चोरीतील सोने खरेदी करणारा सराफा गजाआड

By Admin | Updated: November 22, 2015 02:26 IST2015-11-22T02:26:35+5:302015-11-22T02:26:35+5:30

सराफाची कारागृहात रवानगी, ३0 ग्रॅम सोने जप्त.

Gold jeweler buying stolen gold | चोरीतील सोने खरेदी करणारा सराफा गजाआड

चोरीतील सोने खरेदी करणारा सराफा गजाआड

अकोला - महिलांच्या गळय़ातील सोनसाखळी चोरणार्‍या दोन चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून, चोरीतील सोने खरेदी करणार्‍या सराफास स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून ३0 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सराफास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. सोनसाखळी चोरी प्रकरणात हिंगणा रोडवरील रहिवासी गोपी दुर्गाप्रसाद शर्मा व जुने शहरातील सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान लाल खान या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत चोरीतील सोने शहरातील सराफा व्यवसायी विजय राधेश्याम अनासने याला विकल्याची कबुली दिली, त्यावरून त्यास शनिवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील ३0 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, या चोरी प्रकरणातील सोने दोन्ही आरोपींनीही शिवनगर येथील रहिवासी विजय अनासने याला विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ४११ या कलमानुसार अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Gold jeweler buying stolen gold