गणलक्ष्मी करंडक विदर्भस्तरीय एकपात्री स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 03:47 IST2016-10-27T03:47:21+5:302016-10-27T03:47:21+5:30
५ डिसेंबरपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन

गणलक्ष्मी करंडक विदर्भस्तरीय एकपात्री स्पर्धा
अकोला, दि. २६- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर-अकोला शाखेच्यावतीने स्व. गणपतराव जाधव व स्व. लक्ष्मीबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ गणलक्ष्मी करंडक विदर्भस्तरीय एकपात्री स्पर्धेचे शनिवार, १0 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात होऊ घातलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नाट्य कलावंतांना करण्यात आले आहे. यामध्ये ३१११ रुपयांचा प्रथम पुरस्कार स्व. शांताराम जैन यांच्या नावे, २१११ चा द्वितीय पुरस्कार स्व. वसंतराव रावदेव यांच्या नावे, ११११ चा तृतीय पुरस्कार पुष्पा कट्यारमल यांच्या नावे दिला जाणार आहे. दहा स्पर्धक संख्येमागे ५११ रुपयांचा पुरस्कार स्व. दादासाहेब रत्नपारखी यांच्या नावे दिला जाणार आहे. ही स्पर्धा १८ वर्षांंवरील प्रत्येकासाठी खुली राहील. ५ ते ७ मिनिटांचा अवधी कलावंताला दिला जाणार आहे. स्पर्धेची भाषा केवळ मराठी असेल. नवीन संहितेला प्राधान्य दिले जाईल. संहितेच्या तीन प्रती संयोजकांकडे जोडणे गरजेचे आहे. धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही साहित्य नाकारण्याचे अधिकार राखून आहे. कोणताही प्रवासी भाडे भत्ता मिळणार नाही. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी ५ डिसेंबरपूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी प्रा. मधू जाधव, अशोक ढेरे आणि बालचंद्र उखळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.