बकरी चाेरांची माेठी टाेळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:30+5:302021-02-05T06:17:30+5:30
अकाेला : शहरासह जिल्ह्याच्या विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून बकरी चाेरी करणारी माेठी टाेळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी ...

बकरी चाेरांची माेठी टाेळी गजाआड
अकाेला : शहरासह जिल्ह्याच्या विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून बकरी चाेरी करणारी माेठी टाेळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले. या टाेळीतील चार चाेरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चाेरट्यांना न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली. यामध्ये एक चाेरटा ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती आहे.
बाळापूर तालुक्यातील खीरपुरी येथील रहिवासी मंगेश झागदेव पवार, वय २६ यांच्या गाेठ्यातील २२ हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना २७ ऑक्टाेबर २०२० राेजी घडली हाेती. याप्रकरणी बाळापूर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणातील काही चाेरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने चेतन ऊर्फ श्रीकृष्ण बळीराम ढगे (वय २८ वर्षे, राहणार जवळा, ता. शेगाव, जि. बुलडाणा) ह.मु. अशोकनगर, वाडेगाव, प्रदीप बाबूराव हिवराळे (वय २७ वर्षे, रा. चिताेडा, जि. बुलडाणा), शेख युसूफ शेख मुसा (वय ५६ वर्षे, राहणार पंचशीलनगर, वाडेगाव, शेख सलीम ऊर्फ बाबू जमादार शेख रहुल्ला (वय ४४ वर्षे, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बाडेगाव) या चार जनांना अटक केली. या चाेरट्यांची स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी कसून चाैकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या सात चाेऱ्यांची कबुली दिली. यामध्ये पातूर पाेलीस स्टेशन, बाळापूर पाेलीस स्टेशन, बाेरगाव मंजू पाेलीस स्टेशन यासह विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांतून बकऱ्या चाेरल्याचे समाेर आले. या चार चाेरट्यांकडून बकरी चाेरून विकलेले ७० हजार रुपये, एक ६० हजार रुपयांची दुचाकी, चार लाख रुपये किमतीची आलिशान कार, एक माेबाइल, असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांकडून जप्त करण्यात आला आहे. या चाेरट्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, प्रमोद डोईफोडे, आश्विन शिरसाट, मनोज नागमते, संदीप टाले, प्रवीण कश्यप यांनी केली.