‘जीएमसी’च्या दुर्गा बागडे उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित

By Admin | Updated: July 9, 2017 19:42 IST2017-07-09T19:42:42+5:302017-07-09T19:42:42+5:30

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना नर्सिंग क्षेत्रातील मानाचा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

GMC's Durga Bagde is honored with excellent clinical nurse award | ‘जीएमसी’च्या दुर्गा बागडे उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित

‘जीएमसी’च्या दुर्गा बागडे उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना नर्सिंग क्षेत्रातील मानाचा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे शुक्रवारी पार पडलेल्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष समारोप सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी, प्रबंधक मंगला अंचन, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नर्सिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) विभागाच्या मुख्य परिसेविका दुर्गा बागडे यांना सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या विदर्भातील एकमेव परिसेविका ठरल्या आहेत.

Web Title: GMC's Durga Bagde is honored with excellent clinical nurse award