विहिरीत पडलेल्या कळविटाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:33 AM2017-11-21T01:33:43+5:302017-11-21T01:34:07+5:30

अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिले.

Given to the well known poem in the well | विहिरीत पडलेल्या कळविटाला दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या कळविटाला दिले जीवदान

Next
ठळक मुद्देवाडेगाव येथील घटना; पाच तास होते विहिरीत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव: अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिले. ४0 फूट खाली पडल्यानंतर काळविटाच्या  पायाला, तोंडाला मार लागला होता.
 या विहिरीत पाच फूट एवढे पाणी होते आणि नुसते काळवीट पाण्यावर तरंगत असताना काही युवकांना दिसून आले. त्यांनी वन विभागाशी संपर्क करून त्यांना पाचारण केले. अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे याच्या मार्गदर्शनात वनपाल पी. बी. गीते वनरक्षक, आर. आर. बिडकर, निसर्ग संवर्धनचे शेख मुन्ना, सागर बोक्षे, अनिल चौधरी, वाहनचालक अनिल जाधव आदींनी घटनास्थळावर भेट देऊन या कळविटाला बाहेर काढले. यावेळी गावातील विलास मानकर, राहुल कातखेडे, सचिन धनोकर, सुश्रुत भुस्कुटे, नकुल नावकार, अजय घटोळ, अनिल कातखेडे, शुभम पाचपोर, गजानन बावणे, राहुल सोनोने, जितेंद्र नेमाडे, सोनू वानखडे, आदींनी सहकार्य केले. काळविटाला बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आले. 

Web Title: Given to the well known poem in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.