जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर निधी जिल्हा परिषदेला द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:17+5:302021-02-05T06:16:17+5:30

अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागाकडे वळता न करता, जिल्हा परिषदेला ...

Give the approved funds in Zilla Annual Plan to Zilla Parishad! | जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर निधी जिल्हा परिषदेला द्या!

जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर निधी जिल्हा परिषदेला द्या!

अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागाकडे वळता न करता, जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या गटनेत्यांनी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे २६ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी इतर कोणत्याही विभागाकडे वळता न करता, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांना विकासकामांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील गटनेत्यांनी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला मंजूर निधी व विकासकामांचे करण्यात आलेले नियोजन या मुद्यावर गटनेत्यांनी पालकमंत्र्यांसोबत चर्चाही केली. यावेळी जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, काॅंग्रेसचे गटनेता सुनील धाबेकर, भाजपचे डाॅ. अमित कावरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विशाल गावंडे उपस्थित होते.

...........................फोटो.......................

Web Title: Give the approved funds in Zilla Annual Plan to Zilla Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.