तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव

By Admin | Updated: July 4, 2017 20:19 IST2017-07-04T20:19:33+5:302017-07-04T20:19:33+5:30

तक्रार घेण्यास टाळाटाळ: मध्यरात्री ‘एसपीं’नी घेतली दखल

Girlfriend in Telhare: Tension for some time | तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव

तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा शहरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने, तसेच काल रात्री अचानक त्या तरुणीवर हल्ला करून लोखंडी वस्तू हातावर मारून जखमी केले. याबाबत पो.स्टे.ला तक्रार देण्याकरिता सदर युवती गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षक यांना फोनवरून आपबिती सांगितली.

पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तेल्हारा पोलीस स्टेशनला पाठविले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर सोमवारी मध्यरात्री तेल्हारा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरामध्ये विनयभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, पोलिसांचा वचक नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Web Title: Girlfriend in Telhare: Tension for some time