फूस लावून पळविलेल्या मुलीला ठाणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:55 IST2021-06-13T18:55:06+5:302021-06-13T18:55:12+5:30
Crime News : पळवून नेलेल्या युवतीला एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाणे जिल्ह्यातील टीटवाळा येथून ताब्यात घेतले.

फूस लावून पळविलेल्या मुलीला ठाणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदर नगर येथून फूस लावून पळवून नेलेल्या युवतीला एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून ठाणे जिल्ह्यातील टीटवाळा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला आवश्यक ती प्रक्रिया करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सुंदर नगर येथील एक मुलगी ३१ मे रोजी अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून या मुलीला ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथून ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेऊन परत आणले. त्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, सिंधू गवई, अजय राऊत, राम चव्हाण यांनी केली.