मुलीला पळविले; दोन युवक ताब्यात

By Admin | Updated: August 19, 2014 00:47 IST2014-08-19T00:47:33+5:302014-08-19T00:47:33+5:30

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.

Girl escapes Two youths detained | मुलीला पळविले; दोन युवक ताब्यात

मुलीला पळविले; दोन युवक ताब्यात

अकोला : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास बाळापूर रोडवरील दोन युवकांना ताब्यात घेतले. शिवसेना वसाहतीमध्ये राहणारी १४ वर्षीय मुलीस १६ ऑगस्ट रोजी परिसरातील दोन युवकांनी फूस लावून नेल्याचा आरोप तिच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला. पोलिसांनी त्यानुसार दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान जुने शहरचे पीएसआय शिंपी यांना मुलीस मनमाड येथे पळवून नेल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथक पाठवून मुलीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आणि तिला सोमवारी पालकांच्या ताब्यात दिले. मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बाळापूर रोडवरील हरीश व पवन नामक युवकास ताब्यात घेतले. या दोघांसह मुलींची चौकशी केल्यानंतरच घटनेचा उलगडा होईल.

Web Title: Girl escapes Two youths detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.