पातूर गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार घुले यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST2020-12-11T04:45:19+5:302020-12-11T04:45:19+5:30

पातूर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार कनिष्ठ प्रशासन अधिकारी यू.एल. घुले यांना देण्यात आला आहे. ...

Ghule is in charge of Pathur Group Education Officer | पातूर गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार घुले यांच्याकडे

पातूर गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार घुले यांच्याकडे

पातूर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार कनिष्ठ प्रशासन अधिकारी यू.एल. घुले यांना देण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी अर्जित रजेवर गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ गेल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार ढेपाळला होता. यासंदर्भात लोकमतने २८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, घुले यांच्याकडे प्रभार देण्यात आला.

गेल्या महिनाभरापासून या विभागाचा प्रभार अनेक अधिकाऱ्यांकडे देण्याचा प्रयत्न झाला. तसे आदेशही काढण्यात आले. मात्र या पदाचा प्रभार कोणीही स्वीकारला नाही. त्यामुळे या विभागाचे कामकाज प्रभावित झाले होते. शिक्षण विभागाने पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी यू.एल. घुले यांच्याकडे देण्याचा आदेश गुरुवारी काढण्यात आला. घुले यांच्याकडे शिर्ला ग्रामपंचायतीचा प्रशासक पदाचा कारभारही आहे.

Web Title: Ghule is in charge of Pathur Group Education Officer