नवी आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा
By Admin | Updated: October 30, 2014 23:31 IST2014-10-30T23:31:06+5:302014-10-30T23:31:06+5:30
अखिल महाराष्ट्र मुख्यध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांचे अवाहन.
_ns.jpg)
नवी आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा
बुलडाणा : साधरण पन्नास वर्षांपूर्वी मुख्याध्यापकांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून उदयास आलेली अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची व्याप्ती आता देशपातळीवर झाली असून, मुख्याध्यापक संघाचे ऑल इंडिया फेडरेशन तयार करण्यात आले आहे. येणार्या काळात विविध राज्यात भेटी देऊन ते थील शैक्षणिक गुणवत्तेबाबात व्यापक अभ्यास करून येणार्या पिढीला नवे आव्हाने पेलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील बदल घडविण्याचे काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांनी केले. ५४ व्या राज्यव्यापी मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनाच्या निमित्ताने ते बुलडाणा येथे आले असता, ते खास लोकमतशी बोलत होते.
मुख्याध्यापक संघाची स्थापना करण्याच्या उद्देश काय होता ?
-१९६६ चा तो काळ होता. शासनाचे शिक्षण क्षेत्राकडे फार लक्ष नव्हते. अनेक समस्यांना मुख्यध्यापकांना सामोरे जावे लागत होते. मूलभूत सुविधा नव्हत्या. अत्यंत तुटपुंज्या पगारावर मुख्यध्यापकांना काम करावे लागत होते. त्यातून संघाची कल्पना समोर आली. पुढे संघाची व्याप्ती वाढली. शासन दरबारी आमच्या प्रश्नाची दखल होऊ लागली. त्यासाठी आम्हाला अनेक लढे द्यावे लागले. त्याचेच फळ म्हणजे आज शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसत आहेत.
मुख्याध्यापकांसमोरील आव्हाने कोणती आहेत?
-विद्यार्थी हा केंद्रबिंदू माणून प्रत्येक मुख्याध्यापक हा काम करीत असतो. आज शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. ह्या बदलाला सामोरे जाण्याचे आव्हाने पेलण्याची ताकद मुख्यध्यापकांमध्ये असली पाहिजे. त्यासाठीच अशा सभा संमेलनाची गरज आम्हाला भासते. एकीकडे मुठभर पैशावाल्यांची समांतर शिक्षण व्यवस्था निर्माण होत आहे. दुसरीकडे आजही बहुसंख्याक समाजाला सरकारी शिक्षण व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपली गुणवत्ता कशी वाढेल व सामान्य गरीब विद्यार्थ्याला दज्रेदार शिक्षण देऊन तो स्पर्धेत कसा टीकेल, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी बदलत्या काळाची पाऊले ओळखून स्वत: मध्ये बदल घडविणे आजची गरज आहे. अशा संमेलनातून हाच संदेश दिल्या जातो.
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी संघ काम करतो का?
-होय ! अर्थात तेच आमचे महत्त्वाचे काम आहे. शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांवर असते. आपल्या सर्व सहकार्यांमार्फत शाळेचा गौरव वाढविण्यासाठी मुख्याध्यापक काम करीत असतात. त्यामुळे संघाच्या वतीने नव्या शैक्षणिक धोरणांपासून तर आव्हानांपर्यत वेळोवळी मुख्याध्यापकांना माहिती दिली जाते.
-नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
मागील सरकारने बर्यापैकी प्रश्न मार्गी लावले. आरटीआय कायद्यामध्ये सुधारणा, संच मान्यतेच्या त्रुटी, सहाव्या वेतन आयोगातील दुरूस्त्या किंवा मुख्यध्यापकांच्या वेतनातील दुरूस्त्या, हे प्रश्न येणार्या सरकारने मार्गी लावावेत. त्यासाठी सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेल नव्या शिक्षणमंत्र्याना भेटून अधिवेशनात झालेल्या ठरावाची प्रत आम्ही सादर करणार आहोत. नवे सरकार या समस्या मार्गी लावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.