जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST2021-09-21T04:21:50+5:302021-09-21T04:21:50+5:30

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. ...

General meeting of Zilla Parishad today! | जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा !

जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा !

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने या सभेत धोरणात्मक आणि आर्थिक बाबीशी संबंधित कोणताही निर्णय होऊ शकणार नाही.

जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांपैकी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात आलेले १२ ठराव वगळून मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच धोरणात्मक आणि आर्थिक विषयाशी संबंधित नसलेल्या काही मुद्द्यांवर या सभेत चर्चा होणार आहे.

Web Title: General meeting of Zilla Parishad today!