स्वस्त धान्य दुकानदारांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST2021-02-05T06:12:52+5:302021-02-05T06:12:52+5:30

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शर्मा ...

A gathering of cheap grain shopkeepers | स्वस्त धान्य दुकानदारांचा मेळावा

स्वस्त धान्य दुकानदारांचा मेळावा

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शर्मा व स्वस्त धान्य दुकानदार संघटना कार्यकारी जिल्हाध्यक्ष कैलास महाजन, जिल्हा सचिव अमोल सातपुते, आरीफ भाई, अकोला महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल उपस्थित होते.

मेळाव्यात स्वस्त धान्य दुकानासंबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित सदस्याचासुद्धा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात स्वस्त धान्य दुकानदार ज्यांचा मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. नगर परिषदच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा ममता कैलास महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन बोर्डे, दादाराव जामनिक, सलीमबिन मोहम्मद, भीमराव कोकणे, देवानंद वानखडे, प्रदीप भालेराव, अजय अग्रवाल, आजमबेग, गजानन त्रिकाने, सुमित सोनोने, सुनील गावंडे, गुड्डू साबळे, नीलेश अग्रवाल, संजय पखाले, संजय महाजन, बाळासाहेब सरोदे, रामदास तराळ, अंगद गावंडे, विक्की गवई, जगदीश मारोटकर, संतोष गायकवाड, संजय सुपले, लखन अग्रवाल, नजाकत अली, नाचणे गुरुजी, दिनेश निमोदिया, प्रवीण खोत, मोहन सदार, गजानन ठाकरे, अजीम भाई, चंदू देशमुख, तेलमोरे उपस्थित होते.

Web Title: A gathering of cheap grain shopkeepers