हातगावात आग लागल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:38 IST2018-01-05T13:35:16+5:302018-01-05T13:38:06+5:30
बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला.

हातगावात आग लागल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी
बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला.
हातगाव येथे बावलाबाई गणपत गोपकर या वृध्द महिलेचे घर आहे. गुरुवार, ४ जानेवारीच्या रात्री घराला अचानक आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण घराला वेढले. आग लागल्याच चाहूल लागताच बावलाबाई घराबाहेर पडल्या. यावेळी घरात असलेल्या गॅस सिलींडरचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घरच बेचिराख झाले. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत १ बकरी २ पिले, जीवनावश्यक वस्तु, कपडे जळून खाक झाले. दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना तत्काळ शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी भाजपा सरचिटणी गडेकर, बार्शीटाकळी शहर भाजपा अध्यक्ष अनंत केदारे, बुथ प्रमुख संजय इर्चे, संतोष महाजन व गावकरी उपस्थित होते.