गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:20 IST2018-09-19T15:19:43+5:302018-09-19T15:20:09+5:30
मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले.

गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्य जळून खाक
मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले.
उमई येथील मनोहर मानकर यांच्या घरात कोणी नसताना घरातील स्वयंपाकाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, मोबाईलसह भांडीकुंडी रोख हजार रुपये जळून खाक झाले. घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरातील तीघेही घरात नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला; मात्र या स्फोटात त्यांचे ४० हजारांचे वर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार राहूल तायडे यांनी दिली. यावेळी शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून ४ हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार राहूल तायडे, तलाठी अलपेश खडसे व गॅस एजन्सीचे अजय चक्रे यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी )
सिलिंडर स्फोटात मानकर कुटुंबीयांचे ४० हजारांचे जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तातडीची मदत म्हणून त्यांना चार हजार रुपये देण्यात आले आहे. घराचे नुकसानाचा अंदाज काढून पुढील रक्कम देण्यात येईल.
- राहुल तायडे
तहसीलदार, मूर्तिजापूर