शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:56 PM2018-06-20T14:56:57+5:302018-06-20T14:56:57+5:30

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Garbage debris in the city; NMC's health system collapsed | शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

शहरात कचऱ्याचे ढिगारे;  मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

अकोला : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना, शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे व कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपाची स्वच्छता व आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी कंत्राटदारांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना अकोला शहरातील अस्वच्छता दिसत नाही का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियान राबवण्यास सुरुवात केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून केंद्रासह राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने विलगीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा कचºयाचे विलगीकरण केल्यावरच त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय डम्पिंग ग्राउंडवर टाकलेल्या कचºयावरही प्रक्रिया करण्यासाठी स्वायत्त संस्थांनी ठोस निर्णय घेणे शासनाला अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. प्राप्त निधीतून कचºयाची समस्या निकाली काढण्याची गरज असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यासह देशभरात ‘स्वच्छ भारत’ अभियानचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.


अकोलेकरांना जबाबदारीचा विसर
शहराच्या कोण्याही भागात फेरफटका मारल्यास सर्व्हिस लाइन घाणीने गच्च भरल्याचे दिसून येते. गल्लीबोळात कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकही त्यांच्या घरातील केरकचरा घंटागाडीत कितपत टाकतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घरातील कचरा घंटागाडीत टाकल्यास उघड्यावर कचरा साचणार नाही, याची जाण अकोलेकरांनी ठेवण्याची गरज आहे.

 

आरोग्य निरीक्षक सुस्त, अकोलेकर त्रस्त!
शहरात दैनंदिन होणाºया साफसफाईच्या कामावर देखरेख ठेवून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अखत्यारित सेवा बजावणाºया आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यांच्यावर मानधन तत्त्वावर कार्यरत सहाय्यक आरोग्य निरीक्षक अब्दुल मतीन यांचे नियंत्रण आहे. शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठेत साचलेली घाण सर्वसामान्य अकोलेकरांना दिसत असताना मनपाचे आरोग्य निरीक्षक दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या भागात घाण व कचरा साचला असेल, त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकांच्या वेतनातून दंड वसूल करण्याची गरज आहे.

 

Web Title: Garbage debris in the city; NMC's health system collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.