अंदुरा येथे गांजाची शेती, तीन किलो गांजा जप्त

By नितिन गव्हाळे | Updated: September 19, 2023 19:36 IST2023-09-19T19:36:04+5:302023-09-19T19:36:11+5:30

ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

Ganja cultivation in Andura, three kg of ganja seized | अंदुरा येथे गांजाची शेती, तीन किलो गांजा जप्त

अंदुरा येथे गांजाची शेती, तीन किलो गांजा जप्त

अकोला : स्थानिक गुन्हे शाखा पथकाला पोलिस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी (५०) याने त्याच्या शेतात अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केली असून तो अंमली पदार्थ गांजाची विक्रीसुद्धा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा घालून त्याच्या शेतातून चार गांजाची झाडे व तीन किलो दहा ग्रॅम गांजा हस्तगत केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

श्याम नारायण कुलकर्णी रा. जुना अंदुरा ता. बाळापूर याच्या शेतात एकूण चार गांजाची जिवंत झाडे व विक्री करिता बाळगून असलेला अंमली पदार्थ गांजा एकूण ३ किलो १० ग्रॅम किंमत अंदाजे ४१ हजार रूपये व इतर साहित्य आढळून आले. आरोपीकडून गांजा जप्त करून पुढील कारवाई करीता जप्त मुद्देमाल व आरोपी उरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास भगत, पोहवा. दत्तात्रय ढोरे, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, महेंद्र मलीये, अब्दुल माजीद, रवी खंडारे, ऐजाज अहमद, गणेश धुंपटवाड, भीमराव पिदके, अक्षय बोबडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी हांडे, तहसीलदार बाळापूर राहुल तायडे यांनी केली.
 

Web Title: Ganja cultivation in Andura, three kg of ganja seized