सराफा व्यापार्यास लुटणारी टोळी गजाआड
By Admin | Updated: October 3, 2014 02:01 IST2014-10-03T02:01:07+5:302014-10-03T02:01:07+5:30
५0 हजार रुपयांची रोख लंपास करणारी चार जणांची टोळीला अटक.

सराफा व्यापार्यास लुटणारी टोळी गजाआड
अकोला: सराफा बाजारामधील परेश चंदूलाल सराफ यांची स्कूटी पळवून डिक्कीतील ५0 हजार रु पयांची रोख लंपास करणारी चार जणांची टोळी अँन्टी गुंडा स्क्वॉडने गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास गजाआड केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये खैर मोहम्मद प्लॉटमधील सैयद आमिर सैयद हाशम (२७), मो. मोबिनोद्दीन मो. अजीमुद्दीन, दगडी पूल परिसरातील रोहित रवींद्रनाथ तिवारी (२८), कौलखेड श्रद्धानगरातील रितेश ऊर्फ विशाल नंदकिशोर नांदूरकर (२९) यांचा समावेश आहे. सराफा व्यापारी परेश सराफ यांना २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास एसए कॉलेजसामोरून दोघांनी सराफ यांची स्कूटी पळवून नेली आणि क्रीडा संकुलाजवळ स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले ५0 हजार रुपये घेऊन पळ काढला होता. शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात अँन्टी गुंडा स्क्वॉडचे महेंद्र बहादूरकर, विलास बंकावार, असद खान, शक्ती कांबळे, सुरज चिंचोळकर यांनी तपास करून सराफा व्यवसायी रितेश नांदूरकर याला ताब्यात घेतले.