दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:45+5:302021-06-06T04:14:45+5:30

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातानगर येथील रहिवासी संतोष राजू गाडेकर वय २४ वर्षे आणि विशाल दिनकर सोनोने वय ...

A gang of two was deported for two years | दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातानगर येथील रहिवासी संतोष राजू गाडेकर वय २४ वर्षे आणि विशाल दिनकर सोनोने वय २५ वर्षे हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून रामदास पेठ पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. रामदास पेठ पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांच्याही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश शनिवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन जिल्हाने यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.

Web Title: A gang of two was deported for two years