टोळीने गुन्हे करणाऱ्या दाेघांना केले दाेन वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:09+5:302021-08-23T04:22:09+5:30

डाबकी राेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी लढ्ढया ऊर्फ शेख उमर शेख हारून वय ४१ वर्षे ...

The gang deported the accused for two years | टोळीने गुन्हे करणाऱ्या दाेघांना केले दाेन वर्षासाठी हद्दपार

टोळीने गुन्हे करणाऱ्या दाेघांना केले दाेन वर्षासाठी हद्दपार

डाबकी राेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी लढ्ढया ऊर्फ शेख उमर शेख हारून वय ४१ वर्षे व शेख इमरान शेख हारून वय ३४ वर्षे हे दोघेजण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून डाबकी राेड पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. डाबकी राेड पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश शनिवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: The gang deported the accused for two years