विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा २२ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:39 IST2018-12-11T18:38:32+5:302018-12-11T18:39:14+5:30

२२ डिसेंबर रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा रंगणार आहे.

Ganalakshmi one act play competition will be held on 22nd December | विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा २२ डिसेंबरला

विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा २२ डिसेंबरला

अकोला: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर, अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय (मराठी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास गणलक्ष्मी करंडक व रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५ हजार १ रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर द्वितीय विजेत्या स्पर्धकास शांताराम जैन स्मृतिप्रीत्यर्थ रुपये ३ हजार १ रुपये, तृतीय विजेत्या स्पर्धकाला वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ २ हजार १ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. या शिवाय १० स्पर्धक संख्येमागे एक असे दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ ५०१ रुपये रोख उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तिथी १८ डिसेंबर आहे, असे स्पर्धा संयोजक बालचंद्र उखळकर यांनी कळविळे आहे.

Web Title: Ganalakshmi one act play competition will be held on 22nd December