महापौरांचे निधीसाठी गडकरींना साकडे

By Admin | Updated: January 5, 2016 02:01 IST2016-01-05T02:01:32+5:302016-01-05T02:01:32+5:30

महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निधीची मागणी केली.

Gadkari's support for the Mayor's fund | महापौरांचे निधीसाठी गडकरींना साकडे

महापौरांचे निधीसाठी गडकरींना साकडे

अकोला: शहर विकासासाठी केंद्राच्या मदतीची आवश्यकता असल्याचे सांगत महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निधीची मागणी केली. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांच्याक डे भेट घेतली. शहर विकासाच्या मुद्यावर महापौर देशमुख यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. अकोला शहराचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न होत आहेत. गत २५ वर्षांपासून शहराचा विकास रखडला असून, हा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीची गरज असल्याचे महापौरांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सांगितले. शहर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Gadkari's support for the Mayor's fund