शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

अकोला जिल्ह्यातील १०६ पाणी पुरवठा योजनांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:54 IST

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६१ वाड्या-वस्ती, गावांसाठी १०६ पाणी पुरवठा योजनांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने ही स्थगिती उठवत २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे घेण्यास मंजुरी दिली. जिल्ह्यातील ३६१ गावांमध्ये असलेल्या वाड्या, वस्त्यांसाठी १०६ योजना मंजूर करण्यात आल्या. २५ गावांसाठी १९ योजना मंजूर असून, त्यासाठी ३६ कोटी ९७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६१ वाड्या-वस्ती, गावांसाठी १०६ पाणी पुरवठा योजनांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे.केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये स्थगिती दिली होती. त्यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने ही स्थगिती उठवत २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यामध्ये पालकमंत्री डॉ. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, १०० पेक्षाही अधिक ग्रामपंचायत सरपंचांनी मागणी केलेल्या योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३६१ गावांमध्ये असलेल्या वाड्या, वस्त्यांसाठी १०६ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यासाठी ३८९ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. दोन वर्षांनंतर हा जम्बो आराखडा तयार झाला. यापूर्वी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून २५ गावांसाठी १९ योजना मंजूर असून, त्यासाठी ३६ कोटी ९७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.ग्रामीण पेयजल योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने गाव हगणदरीमुक्तीची अट घातली होती. त्यानुसार मागील तीन वर्षांत स्वच्छ भारत मिशनमध्येही मंत्री लोणीकर यांनी ३१ मार्च २०१८ रोजी संपूर्ण राज्य हगणदरीमुक्त करुन दाखविले. त्यामुळेच २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश झाला, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.- तालुकानिहाय मंजूर योजना, निधीतालुका गावे योजना निधी (कोटी)अकोला ९९ ३० १००.९३अकोट ९४ (१८१) २४५.९३तेल्हारा ८० --- ---बाळापूर १६ १५ १३.०१बार्शीटाकळी ३० २५ १३.०५मूर्तिजापूर ३७ ३० १२.०६पातूर ५ ५ ४.१०

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक