फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक

By Admin | Updated: July 19, 2016 01:59 IST2016-07-19T01:59:44+5:302016-07-19T01:59:44+5:30

मनोज धुमोने हत्याकांड प्रकरणी फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक; २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी.

Fugitive accused arrested after one year | फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक

फरार आरोपीस एक वर्षानंतर अटक

अकोला: गुलजारपुरा येथे २0१५ मध्ये घडलेल्या मनोज धुमोने हत्याकांडातील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी सोमवारी अटक केली. सैय्यद मोईद सैय्यद रहीम असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुलजारपुरा येथील रहिवासी मनोज धुमोने आणि जय वाडेकर यांच्यावर ३१ जुलै २0१५ रोजी क्षुल्लक कारणावरून एका गटाने प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मनोज धुमोनेला रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात येत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता तर त्याचा मित्र जय वाडेकर याची प्रकृती गंभीर होती. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी जावेद नामक युवकासह काही जणांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले होते. तर या प्रकरणातील काही युवक गत एक वर्षापासून फरार झाले होते. यामधील सै. मोईद सै. रहीम याला गोपनीय माहितीवरून सोमवारी अटक केली. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून ते कारागृहात आहेत. सोमवारी अटक केलेल्या मोईदला न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Fugitive accused arrested after one year