सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध; अकोल्यातील रुग्णांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:24 IST2024-12-26T18:22:04+5:302024-12-26T18:24:50+5:30

अत्याधुनिक RTMS तंत्रज्ञानाद्वारे उपचार आता अकोल्यात

Free mental health treatment available at Sanmitra Manas Hospital in Akola | सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध; अकोल्यातील रुग्णांना दिलासा

सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध; अकोल्यातील रुग्णांना दिलासा

अकोला: मानसिक आरोग्य ही आजच्या काळात एक महत्त्वाची समस्या ठरत आहे. अनेकांना मानसिक आजारांवर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा आर्थिक अडचणींमुळे ते उपचार घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत सन्मित्र मानस हॉस्पिटल आणि रिहॅब सेंटर, अकोला यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना मानसिक आजारांवर दर्जेदार आणि मोफत उपचार घेण्याची संधी मिळणार आहे.

सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार दिले जात आहेत. त्यामध्ये मारपीट करणे, बडबड करणे, गंभीर मानसिक समस्या, उदासीनता, चिंता, सतत हात धुण्याची सवय (OCD), डोकेदुखी (मायग्रेन), आकडीचे झटके (सफट्स), फोबिया आणि भ्रम यांसारख्या आजारांचा समावेश आहे. पेशंट भरती असतांना औषधे, गोळ्या, रक्त तपासणी, राहणे, खाणे पिणे, शॉक ट्रीटमेंट इत्यादी कोणताही खर्च लागत नाही हे सर्व उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जात असल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक RTMS तंत्रज्ञानाचा वापर करून काही गंभीर मानसिक आजारांवर उपचार केले जात आहेत. रिपेटिटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (RTMS) ही एक नॉन-इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती असून ती उदासीनता, चिंता, OCD आणि धूम्रपानाच्या सवयीवर प्रभावी ठरते. RTMS तंत्रज्ञानामुळे मेंदूतील पेशी सक्रिय होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. विशेषतः उपचार-प्रतिरोधक (ट्रीटमेंट रेसिस्टंट) असलेल्या डिप्रेशनवर या तंत्रज्ञानाने ५० ते ६० टक्के यशस्वी परिणाम साध्य होतात. अमेरिकेच्या FDA मान्यतेने हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.

Web Title: Free mental health treatment available at Sanmitra Manas Hospital in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.