वाडेगाव येथे सॅनिटायझरचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:28+5:302021-06-18T04:14:28+5:30

पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी गायब! मूर्तिजापूर : तालुक्यातील १६५ खेड्यांशी संबंधित असलेल्या पुरवठा विभागात गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकही ...

Free distribution of sanitizers at Wadegaon | वाडेगाव येथे सॅनिटायझरचे मोफत वाटप

वाडेगाव येथे सॅनिटायझरचे मोफत वाटप

Next

पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी गायब!

मूर्तिजापूर : तालुक्यातील १६५ खेड्यांशी संबंधित असलेल्या पुरवठा विभागात गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकही कर्मचारी, अधिकारी दिसून आला नाही. गुरुवारी दुपारी पुरवठा विभाग कार्यालयात फेरफटका मारला असता, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दिसून आले नाहीत.

पोही येथील रोहित्राची दुरवस्था

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम पोही येथे कृषिपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राची दुरवस्था झाली आहे. रोहित्रातील सर्व फ्यूज तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

चतारी रुग्णालयातील वॉटर फिल्टरची दुरुस्ती करा!

खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयात चान्नी, सुकळी, रांगोळी, तुलंगा, खेट्री, शिरपूर, पिंपळखुटा, उमरा, पांगरा आदी गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. रुग्णालयात वॉटर फिल्टर, बेडची दुरवस्था झाल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पातूर परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय

पातूर : परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गत दोन दिवसापूर्वी पातूर-अकोला मार्गावरील एका गोटफार्ममधून बकऱ्या चोरी गेल्या आहेत.

वाडेगाव-देगाव रस्त्याचे काम निकृष्ट

वाडेगाव : गत महिन्यात रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत रस्त्यावर खड्ड्यांमधून गिट्टी उखडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टिटवन-किनखेड रस्त्याची दुरवस्था

बार्शीटाकळी : तालुक्यातील टिटवन-किनखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Free distribution of sanitizers at Wadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.