आकिब खून प्रकरणातील चौथा आरोपी अटकेत

By Admin | Updated: June 24, 2016 00:39 IST2016-06-24T00:39:19+5:302016-06-24T00:39:19+5:30

न्यायालयाने आरोपीस २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

The fourth accused in the case of Aakib murder case | आकिब खून प्रकरणातील चौथा आरोपी अटकेत

आकिब खून प्रकरणातील चौथा आरोपी अटकेत

अकोला: हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकिब खून प्रकरणातील चौथ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकिब शेख आरीफ याच्यावर सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकिबचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फिरोज, शेख हसन आणि शेख रियाज या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर मंगळवारी रात्री यामधील मुख्य आरोपी शेख कासम शेखजी, शेख मजीद शेख इब्राहिम व शेख हसन शेख इब्राहिम या तीन आरोपींना अटक केली असून बुधवारी रात्री शेख वशीम शेख बशीर या चौथ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

Web Title: The fourth accused in the case of Aakib murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.