विद्युत प्रवाहाच्या धक्क्य़ाने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू
By Admin | Updated: August 1, 2015 01:18 IST2015-08-01T01:18:19+5:302015-08-01T01:18:19+5:30
पातूर येथील घटना.

विद्युत प्रवाहाच्या धक्क्य़ाने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू
पातूर (जि. अकोला): येथील एका चार वर्षीय बालिकेचा घरातील डी.व्ही.डी.प्लेअरला स्पर्श झाला असता विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी घडली. स्थानिक मिलिंदनगर भागातील रहिवासी असलेल्या प्राण गवई यांची चार वर्षे वयाची वैदेही ऊर्फ चिऊ प्राण गवई ही शुक्रवारी दुपारी घरात टी.व्ही.पाहत असताना डी.व्ही.डी.प्लेअरला हात लागला. त्यामध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा तिला जबर धक्का बसला. त्यामुळे तिला उपचारासाठी अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर बालिकेच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.